रूप पाहता लोचनी...
Saturday, January 7, 2012
विठाई किठाई माझे कृष्णाई कान्हाई
रंगा येई वो येई, रंगा येई वो येई |
विठाई किठाई माझे कृष्णाई कान्हाई ||
वैकुठवासिनी विठाई जगत्र जननी |
तुझा वेधू माझे मनी ||
कटी कर विराजित मुगूट रत्नजडीत |
पितांबरू कासिला तैसा येई का धावत ||
विश्वरूप विश्वं-भरे कमळ-नयने कमळा-करे वो |
तुझे ध्यान लागो बाप रखुमादेवीवरे वो ||
विठ्ठला, तू वेडा कुंभार
फिरत्या चाकावरती देसी मातीला आकार
विठ्ठला, तू वेडा कुंभार !
माती, पाणी, उजेड, वारा
तूच मिसळसी सर्व पसारा
आभाळच मग ये आकारा
तुझ्या घटांच्या उतरंडीला नसे अंत, ना पार !
घटाघटांचे रूप आगळे
प्रत्येकाचे दैव वेगळे
तुझ्याविना ते कोणा नकळे
मुखी कुणाच्या पडते लोणी, कुणा मुखी अंगार !
तूच घडविसी, तूच फोडिसी
कुरवाळिसि तू, तूच ताडीसी
न कळे यातुन काय जोडीसी ?
देसी डोळे, परि निर्मिसी तयांपुढे अंधार !
अरे अरे ज्ञाना झालासी पावन...
अरे अरे ज्ञाना झालासी पावन |
तुझे तुज ध्यान कळो आले ||
तुझा तूचि देव तुझा तूचि भाव |
फिटला संदेह अन्यतत्वी ||
मुरडूनिया मन उपजलासी चित्ते |
कोठे तुज रिते न दिसे रया ||
दीपकी दीपक मावळल्या ज्योती |
घरभरी वाती शून्य झाल्या ||
वृत्तीची निवृत्ति अपणासकट |
अवघेची वैकुंठ चतुर्भुज ||
निवृत्ति परमानुभव नेमा |
शांतिपूर्ण क्षमा ज्ञानदेवो ||
Home
Subscribe to:
Comments (Atom)